Virat Kohli ने शुभमन गिलला टीम इंडियाचा ‘भविष्यातील स्टार’ म्हटले, इंस्टाग्रामवर शेअर केला खास फोटो

विराट कोहली शुभमन गिल Virat Kohli on shubhaman gill: टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात 126 धावांची नाबाद खेळी केली.

त्याने आपल्या खेळीत 12 चौकार आणि सात षटकार मारले. गिलचे हे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक आहे.

यापूर्वी गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही उत्कृष्ट द्विशतक झळकावले होते. त्याचा उत्कृष्ट फॉर्म पाहून भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने शुभमन गिलला टीम इंडियाचा ‘भावी स्टार’ म्हटले आहे.

कोहलीने इंस्टाग्रामवर गिलसोबतचा एक खास फोटो शेअर केला

कोहलीने इंस्टाग्रामवर गिलसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Shubhaman gill
Virat Kohli with shubhaman Gill

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्‍या T20 मध्ये शुभमन गिलने अवघ्या 63 चेंडूत 126 धावा करून नाबाद राहिला. त्याने केवळ 54 चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. यासह गिल भारतीय क्रिकेटच्या इतिहासात टी-२० मध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे.

तसेच, तो T20 फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा (126) बनला आहे. त्याचवेळी माजी कर्णधार विराट कोहलीने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत शुभमन गिलच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. तिरुअनंतपुरममधील श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमधील गिलसोबतचा एक फोटो त्याने पोस्ट केला. कोहलीने त्याच्या इन्स्टा स्टोरीच्या कॅप्शनमध्ये लिहिले- ‘स्टार, भविष्य इथे आहे..’

शुभमन गिलने शतक झळकावून अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. भारतासाठी 126 धावा ही आंतरराष्ट्रीय टी-20 मधील कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे.

यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. कोहलीने आशिया कप 2022 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 61 चेंडूत 122 धावा केल्या होत्या. गिलने अवघ्या 146 दिवसांत हा विक्रम मोडला.

तसेच गिलने टीम इंडियाचा माजी फलंदाज सुरेश रैनाचा विक्रम मोडला आहे. T20I मध्ये शतक झळकावणारा गिल हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम रैनाच्या नावावर होता. रैनाने 2010 मध्ये 23 वर्षे 156 दिवस वयाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 101 धावा केल्या होत्या. गिलने 23 वर्षे 146 दिवसांत हा पराक्रम केला, जो रैनापेक्षा 10 दिवस कमी आहे.

नाणेफेक जिंकल्यानंतर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 4 गड्यांच्या मोबदल्यात 234 धावा केल्या होत्या. भारताकडून शुभमन गिलने नाबाद १२६ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय राहुल त्रिपाठीने 22 चेंडूत 44 धावांची तुफानी खेळी केली.

235 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 66 धावांत गारद झाला. यादरम्यान हार्दिक पांड्याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि शिवम मावी यांना 2-2 यश मिळाले. अशाप्रकारे भारताने हा सामना 168 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून मालिका 2-1 अशी जिंकली.

हे पण वाचा >>

INDvsAUS: रोहित शर्माने नागपूर जिंकले आणि म्हणाला – भारतात कर्णधारपद सांभाळणं खूप कठीण, अश्विन-जडेजा करतात भांडणं !!!

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी: ऑस्ट्रेलियन संघ एकाच सत्रात कोसळेल अशी अपेक्षा नव्हती, रोहित शर्मा

पहिली कसोटी: ICC आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल रवींद्र जडेजाला ठोठावला दंड !!!!! मॅच फी च्या 25 % दंड . वाचा नेमक काय आहे प्रकरण???

अर्रर….मोहम्मद शमीने सिक्स मारण्याच्या रेकॉर्डमध्ये विराट कोहली, युवराज सिंग तर काय …….सर्वांनाच टाकले मागे !!!!

Marathi Cricket News मराठी क्रिकेट बातम्या, क्रिकेट स्कोअर, लाइव्ह अपडेट्स, हायलाइट्स आणि सर्व सामन्यांच्या बातम्या मिळवा फक्त क्रिकेट चा किडा वर.

Cricket cha Kida FacebookCricket Cha Kida Instagram
Cricket Cha Kida TelegramCricket Cha Whatsapp Group

Leave a Comment