IND vs AUS : मेरे को क्या दीखा रहा रिव्यू दीखा..’, डीआरएस घेतल्यानंतर कॅमेरामनने रोहितला स्क्रीनवर दाखवायला सुरुवात केली, त्यानंतर कॅप्टन बघा काय म्हणाला ?

रोहित शर्मा व्हायरल व्हिडिओ: Rohit Sharma Viral Video नागपूर कसोटी सामन्यात, भारताने अप्रतिम खेळ दाखवत ऑस्ट्रेलियन संघाचा (IND vs AUS) एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला.

रोहित शर्मा व्हायरल व्हिडिओ: नागपूर कसोटी सामन्यात, भारताने अप्रतिम खेळ दाखवत ऑस्ट्रेलियन संघाचा (IND vs AUS) एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला. रवींद्र जडेजाला त्याच्या उत्कृष्ट अष्टपैलूसाठी सामनावीराचा पुरस्कार ही देण्यात आला.

IND vs AUS : मेरे को क्या देखा रहा रिव्यू दिखा..’,

जडेजाने पहिल्या डावात 5 विकेट घेतल्या होत्या आणि दुसऱ्या डावात 2 विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला होता. याशिवाय फलंदाजी करताना 70 धावा केल्या. यामुळेच त्याला सामनावीराचा किताब हा देण्यात आला.

जडेजा आणि अश्विन या फिरकी जोडीने कसोटी सामन्यात कांगारू फलंदाजांची दयनीय अवस्था केली होती, तर रोहित शर्माच्या शतकाने सामन्याचा कल बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. रोहितने 120 धावांची खेळी ही खेळली आणि कसोटी कारकिर्दीतील 9 वे शतक झळकावले.

https://twitter.com/FabulasGuy/status/1624315250748325888?t=39gJBD_j38rNFuWpVKPjqQ&s=19

ज्याची झलक ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात पाहायला मिळाली. खरेतर, दुसऱ्या डावात जेव्हा अश्विनच्या चेंडूवर पीटर हँड्सकॉम्बविरुद्ध एलबीडब्ल्यूचे अपील करण्यात आले आणि पंचांनी अपील फेटाळले, तेव्हा कर्णधार रोहित आणि अश्विनने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला.

अशा परिस्थितीत जेव्हा पंच तिसऱ्या पंचांकडे या निर्णयासाठी गेले तेव्हा कॅमेरामनने रोहितला मैदानावरील स्क्रीनवर दाखवण्यास सुरुवात केली.

दुसरीकडे, रोहित स्वत:ला स्क्रीनवर पाहून हैराण झाला आणि कॅमेरा मेन ची फिरकी घेताना दिसला, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये डीआरएसच्या वेळी टीव्ही स्क्रीनवर स्वत:ला पाहणारा हिटमॅन असे म्हणताना दिसत आहे. , ‘मुझे क्या दीखा रहा रिव्ह्यू दीखा’..’,

रोहितच्या ओठांवरून हे स्पष्ट होत आहे की रोहित या गोष्टी बोलत आहे. रोहितने हे बोलताच त्याच्या मागे उभा असलेला सूर्यकुमार यादव जोरजोरात हसायला लागला. या व्हिडिओवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया या येत आहेत.

हे पण वाचा >>

IND vs AUS: नागपूर कसोटीत भारताच्या दणदणीत विजयावर काय म्हणाले क्रिकेट जगतातील दिग्गज ?? बघा त्यांच्या प्रतिक्रिया.

Virat Kohli ने शुभमन गिलला टीम इंडियाचा ‘भविष्यातील स्टार’ म्हटले, इंस्टाग्रामवर शेअर केला खास फोटो

INDvsAUS: रोहित शर्माने नागपूर जिंकले आणि म्हणाला – भारतात कर्णधारपद सांभाळणं खूप कठीण, अश्विन-जडेजा करतात भांडणं !!!

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी: ऑस्ट्रेलियन संघ एकाच सत्रात कोसळेल अशी अपेक्षा नव्हती, रोहित शर्मा

Marathi Cricket News मराठी क्रिकेट बातम्या, क्रिकेट स्कोअर, लाइव्ह अपडेट्स, हायलाइट्स आणि सर्व सामन्यांच्या बातम्या मिळवा फक्त क्रिकेट चा किडा वर.

Cricket cha Kida FacebookCricket Cha Kida Instagram
Cricket Cha Kida TelegramCricket Cha Whatsapp Group

आमच्या cricket WhatsApp group मध्ये सामील व्हा ईथे क्लीक करा

Leave a Comment